Friday, October 21, 2011

Diwali Faraal Shankarpaale poem

Shankarpale

नाव शंकरपाले; पण त्याच्यामध्ये शंकर नाही 
नाव शंकरपाले; पण भस्मी तो लावत नाही

नाव शंकरपाले; पण नाग अवतीभवती नाही
नाव शंकरपाले; पण डमरू दिसत नाही

नाव शंकरपाले; पण चंद्रकोर जवळ नाही
नाव शंकरपाले; पण पार्वतिही जोडीस नाही

नाव शंकरपाले; पण शंकराशी नाते नाही
शंकर्पाले खुश्कुशीत त्यात मी आनंद पाही 

गोड शंकरपाले; पण कही अगोड असती 
ते कधी  मसालेधार कसेही  आवडती !

Written by Prakash Teredesai (Diwali Faraal, Amol Prakashan, Pune)
Diwali Faraal types & how to make them

No comments:

Post a Comment