Showing posts with label Poems. Show all posts
Showing posts with label Poems. Show all posts

Friday, October 21, 2011

Diwali Faraal Ladoo poem

Soft boondi ladoos
लाडू जणू  बोल  गोल
धक्का  दिल्यास  रोक-एंड-रोल 
लडूमध्ये साजुक  तूप
लाडू देते  शक्ति  खूप 

लडूमध्ये  वेलदोडे 
बादाम-काजुचे टुकड़े 
संगे त्यात चारोली 
लडूला लज्जत  आली 

लाडलाड  लाड  लडू गोद 
त्याची  केली  तोड़म तोड़
लाडू  खला  गोड़ोबा
लाडू  माझा लाडोबा

Written by Prakash Teredesai (Diwali Faraal, Amol Prakashan, Pune)
Diwali Faraal types & how to make them

Diwali Faraal Shankarpaale poem

Shankarpale

नाव शंकरपाले; पण त्याच्यामध्ये शंकर नाही 
नाव शंकरपाले; पण भस्मी तो लावत नाही

नाव शंकरपाले; पण नाग अवतीभवती नाही
नाव शंकरपाले; पण डमरू दिसत नाही

नाव शंकरपाले; पण चंद्रकोर जवळ नाही
नाव शंकरपाले; पण पार्वतिही जोडीस नाही

नाव शंकरपाले; पण शंकराशी नाते नाही
शंकर्पाले खुश्कुशीत त्यात मी आनंद पाही 

गोड शंकरपाले; पण कही अगोड असती 
ते कधी  मसालेधार कसेही  आवडती !

Written by Prakash Teredesai (Diwali Faraal, Amol Prakashan, Pune)
Diwali Faraal types & how to make them

Diwali Faraal Chakli poem


Chakli
 चकल चकल चकली 
गोल गोल केली
तल्ल्यानंतर ती
खुसखुशीत झाली

चकली खुसखुशीत 
सहज ती टूटते 
जेव्हा मी ती खातो 
कुर कुर कुर करते 

चक्लीच्या अंगावर 
काटे पुष्कल असती 
नहीं त्यांचा त्रास 
तेही कुर कुर टूटी 

चकली असते खमंग 
तशीच ती चवदार 
ती जणू भुईचक्र 
गरगरीत आकार 

चकली जरी सलग 
पाकल ती आतून 
ही जणू जादू 
आई दाखवी करून 

चक्लीची भाजणी
कद धन्यांची असे
त्यायील  जीवनसत्वे
अपुले टोनिक असे

Written by Prakash Teredesai (Diwali Faraal, Amol Prakashan, Pune)
Diwali Faraal types & how to make them

Diwali Faraal Karanji poem


Karanji

कर कर करंजी मजला आवडते
गुल-खोब्र्याचे सरन शक्ति देते 

कर कर करंजी मजला आवडते
सारण पुष्कल म्हणून गुज्गुबीत दिसते 

कर कर करंजी मजला आवडते
कारण तल्यावार कुश्कुशीत होते 

कर कर करंजी मजला आवडते
कारण आकाराने  चंद्रकोर  दिसते

कर कर करंजी मोदक तिचाच भाऊ
मोदक, करंजी मन्झे
आवडनारा  खाऊ!

Written by Prakash Teredesai (Diwali Faraal, Amol Prakashan, Pune)
Diwali Faraal types & how to make them