त्रिभुवनमंडितमाळ शोबतसे गळा |
आरती ओवाळून पाहू ब्राह्मपुतळा || १ ||
श्रीराम जय जय राम |
आरती ओवाळून पाहू सुंदर मेघश्याम || ध्रु *||
ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण |
मारुती सन्मुख उभा आहे कर जोडून ||२ ||
श्रीराम *||
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती |
स्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि करीती ||३ ||
श्रीराम *||
रत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटी |
आरती ओवाळू चोवदा (it is fourteen - did not get this right in Marathi script) भुवनांचे पोटी ||४ ||
श्रीराम *||
विष्णुदास नामा म्हणे तूतें ||
आरती ओवाळून पाहू सीतापतीतें ||५ ||
श्रीराम *||
No comments:
Post a Comment